लिंबू पाणी हे शरीरासाठीअत्यंत फायदेशीर असून आरोग्य अधिक निरोगी राखण्यास मदत करते. साखरे शिवाय लिंबू पाणी पिण्याची तर अधिक फायदे आहेत लिंबामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट ची पोषक तत्त्व आढळतात. एक ग्लास लिंबाचे पाणी हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
शरीरातील डीटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करते
लिंबू हे Flevonoids चे स्रोत आहे ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि सूज विरोधी गुणधर्म असतात तसेच विटामिन सी चा स्रोत असणारे हे अत्यंत शक्तिशाली आणि अँटिऑक्सिडंट आहे आणि अँटॉक्सिडंट हे फ्री रॅडिकल्सची लढा देण्याचे काम करून शरीर डिटॉक्सिफाय करते. त्यामुळे सकाळीच उठून लिंबाचे पाणी पिण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहते.
पचन होण्यासाठी उपयोगी
सकाळी सर्वात पहिले जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिता तेव्हा गॅस्टिक समस्या पासून सुटका मिळते आणि पचनशक्तीला याचा फायदा होतो पचनशक्ती नीट नसेल तर दिवसभर पोट फुगल्यासारखे वाटते आणि गॅसमुळे त्रास होतो. यामुळे वजन देखील वाढण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे नियमित लिंबू पाणी पिणे गरजेचे आहे.
लिंबू हे विटामिन सी युक्त
लिंबू आणि आंबट फळही विटामिन सी युक्त असून यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात जे नसांना हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात. याशिवाय व्हिटॅमिन सी हे शरीरातील हार्मोनला प्रेरित करून लोहाच्या अवशेषणासाठी मदत करतात यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि तुम्ही नेहमी उत्साही आणि ताजेतवान दिसता.
हायड्रेशन
दिवसाची सुरुवात ही हायड्रेशन सह करावी ज्यामध्ये लिंबू पाणी हा उत्तम पर्याय आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सुधारणा होण्यासाठी हायड्रेट राहणे गरजेचे आहे. वास्तविक साधे पाणी हा अत्यंत चांगला स्रोत आहे मात्र सर्वांनाच सारखं पाणी पिणे आवडत नाही हे खरं असलं तरीही दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावेच.
शरीराचे वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हे अतिशय फायदेशीर
लिंबा मध्ये असणारे फायबर हे वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. अनेक तज्ञाकडूनही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवायत लिंबू पाणी हे भूक कमी करून मेटाबोलिझमला अधिक प्रवृत्त करते. लिंबू पाणी आणि अन्य फळांच्या एकत्रितपणे बनलेले टिक टॉक वॉटर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करते त्यामुळे सकाळी सकाळी उपाशीपोटी लिंबाचे पाणी पिले पाहिजे.
लिंबाचे पाणी आणि किडनीचे आरोग्य
लिंबू पाणी हे किडनीच्या आरोग्यावरती खूप उपायकारक आहे. लिंबू पाणी हे किडनी स्टोन च्या समस्येसाठी उपयुक्त मानले जाते. किडनीमध्ये मिनरल्स वाचल्याने किडनी स्टोन होतो आणि जास्त पाणी पिण्याने आणि लिंबू पाण्याने यावर परिणाम होऊन ते नैसर्गिकरित्या निघून जातात किंवा त्यासाठी मदत करतात. त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन सकाळी सकाळी उठल्यावर त्वरित करावे.
लिंबू हे इलेक्ट्रोलाईटचा स्रोत आहेत
लिंबू पाण्यात पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स आहेत जे आपल्या हृदयाचे आरोग्य आणि मानस पेशींना हेल्दी ठेवण्यास मदत करत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या सकाळच्या प्रोटीन मध्ये लिंबू पाण्याचा समावेश करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते आणि तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास अधिक मदत होते.