डोळे खोल जाणे - Sunken eyes
डोळे खोल जाणे यालाच आपण Sunken eyes किंवा Hollow eyes असे म्हणतो.
काही वेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्याभोवतीचा भाग हा गडद काळसर दिसू लागतो.
यासोबतच शरीरात अशक्तपणा जाणून येतो चेहऱ्याकडे पाहिले असतील व्यक्ती आजारी पडल्यासारखे दिसून येते या लेखांमध्ये आपण डोळे खोल जाण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय याविषयीची माहिती बघणार आहोत.
डोळे खोल जाण्याची कारणे - Hollow eye
डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत प्रामुख्याने काहीही कारणे आहेत ती खालील प्रमाणे बघुयात.
1. आजारपणामुळे डोळे खोल जातात.
2. शरीरामध्ये आलेला अशक्तपणा
3. आहारातील पोषक घटकांची कमतरता असणे.
4. शरीरामध्ये डीहायड्रेशन होणे.
5. पुरेशी झोप न होणे किंवा अपुरी झोप
6. नेहमी तणावात असणे
7. चिंता करणे
8. वाढते वयासोबत ही डोळे खोल जातात
9. स्मोकिंग करणे
यासारख्या कारणे डोळे खोल जाण्यासाठी बऱ्याच वेळा जबाबदार असतात.
डोळे खोल जाणे किंवा आज जाणे यावर घरगुती उपाय
1. नेहमी संतुलित व पुरेसा आहार घ्यायला हवा
2. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ अंडी, मास, मासे यांचा समावेश असायला हवा.
3. दिवसभरात पुरेशी म्हणजे साधारणतः आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे त्यामुळे डीहायड्रेशन होत नाही.
4. जागरण करणे टाळावे पुरेशी झोप घ्यावी.
5. रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.
6. डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यावर थोडा वेळ ठेवावेत त्यामुळे डोळे थंड होतील.
7. डोळ्याभोवती बदाम तेल लावल्याने ही डोळ्याच्या बाजूला आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते
8. मानसिक ताण घेऊ नये तसेच चिंता करू नये.
9. चहा कॉफी वारंवार पिणे टाळावे.
10. स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या व्यसनापासून दूर राहावे
11. दिसायला कमी असल्यास डोळ्याला चष्मा नेहमी लावावा.
12. संगणक तसेच मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा.
13. गाडी चालवताना सनग्लासेस किंवा चष्म्याचा वापर करावा.
डोळे खोल जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी
• डोळे खोल जाऊ नये यामुळे डोळ्याची काळजी घ्यायला हवे डोळा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.
• नेहमी तणावात किंवा चिंता करत असल्यास डोळे खोल जातात त्यामुळे चिंता करणे किंवा जास्त तणाव घेणे हे डोळ्यासाठी हानिकारक आहे.
• हिरव्या पालेभाज्या तसेच पोषक मूलद्रव्यांचा आहार घ्यावा त्यामुळे डोळे खोल जाणार नाहीत.
• शरीरात आलेला अशक्तपणा त्यामुळे डोळे खोल जातात.
• कॅम्पुटर मोबाईल टीव्ही याचा अतिवापर केल्यानेही डोळ्यावर ती दुष्परिणाम आढळून येतात त्यामुळे डिजिटल डिव्हायसेस चा वापर हा लिमिटेड कामापुरताच करायला हवा.
• बाहेरून फिरून आल्यानंतर डोळे थंड पाण्याने नेहमी धुवावेत त्यामुळे डोळ्यात केलेले धूळ तसेच डोळ्यावर आलेला थकवा पूर्णपणे बरा होतो.
• गाडी चालवताना ड्रायव्हिंग करताना किंवा फिरताना ब्लॅक गॉगल किंवा सनग्लासेस चा वापर करावा.
• तुम्हाला जर नेत्र तज्ञांनी चष्मा दिला असेल तुमची दृष्टी कमी असेल त्यावेळेस तुम्हाला चष्मा वापरणे हे महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा चष्मा न लावल्यामुळे डोळे खोल जातात.
• खराब हात खराब कपडा डोळ्याला लावू नये त्यामुळे डोळ्याला खाज येते इन्फेक्शन होते.
अशाप्रकारे तुम्ही जर डोळ्याची काळजी घेतली तर तुमचे डोळे खोल जाण्यापासून बचाव होईल.